Tue, Feb 7, 2023

अंगणवाडी सेविकांसाठी माहिती सत्र
अंगणवाडी सेविकांसाठी माहिती सत्र
Published on : 21 January 2023, 9:08 am
मालाड, ता. २१ (बातमीदार) ः एकात्मिक बालविकास योजनेच्या गोरेगाव पूर्व प्रकल्प बिट नंबर सहातर्फे अंगणवाडी सेविका रंजना जायभाये यांच्या पुढाकाराने बाल अधिकार व बाल संरक्षण या विषयावर माहिती सत्र आयोजित करण्यात आले होते. भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दीपक सोनावणे यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पालकांना बाल अधिकार, बाल संरक्षण, बाल लैंगिक शोषण या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बिट सहाच्या मुख्यसेविका स्वाती महाडिक व टीआयएसएसचे तृतीयपंथी विद्यार्थी ऋषाली दिशा व सामाजिक कार्यकर्त्या कार्तिकी चुरी, समाजकार्य विद्यार्थी चंदा कांबळे, कार्यक्रमाचे आयोजक, अंगणवाडी सेविका रंजना जायभाये व मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.