बोरिवलीतून साडेबारा लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरिवलीतून साडेबारा लाखांचा गुटखा जप्त
बोरिवलीतून साडेबारा लाखांचा गुटखा जप्त

बोरिवलीतून साडेबारा लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : गुटखा विक्री करणाऱ्या चार आरोपींना बोरिवली पोलिसांनी अटक केली. या कारवाईत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. बोरिवली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बोरिवली पश्चिम परिसरातील कृपाल कुटीर सोसायटीमध्ये काही इसमांनी परराज्यांतून गुटखा आणून विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिस पथकाने माहितीची शहानिशा करून छापा टाकला असता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांचा साठा व विक्री होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला असता १२.५९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा पदार्थ मिळाल्याने तो जप्त केला. या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.