शिवसेना नवघर पूर्व शाखेतर्फे रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना नवघर पूर्व शाखेतर्फे रक्तदान शिबिर
शिवसेना नवघर पूर्व शाखेतर्फे रक्तदान शिबिर

शिवसेना नवघर पूर्व शाखेतर्फे रक्तदान शिबिर

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नवघर पूर्व शाखा, वसई इंडस्ट्रियल असोसिएशन आणि वसई इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रवीण महापळकर, दिलीप चेंदवनकर, तालुकाप्रमुख राजाराम बाबर, व्हीआयएचे अध्यक्ष अनिल आंबडेकर, विमाचे सचिव जतीन सावला, उपतालुकाप्रमुख सुनील मुळे, शहर प्रमुख प्रथमेश राऊत, माहीम विधानसभा सहसंघटक उमेश महाले, शहर संघटक जसिंथा फिंच, रश्मी राव, सूरज शिरोडकर, जयराम राणे, प्रशांत कडुलकर, रुग्णमित्र राजेश ढगे, औद्योगिक विभागातील मालक आणि कामगार वर्ग, शिवाशांघाटचे दत्ता गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये नवघर पूर्व विभाग आणि औद्योगिक परिसरातून १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरप्रमुख संजय गुरव, उपशहरप्रमुख शशिभूषण शर्मा, विभागप्रमुख गंगाप्रसाद यादव, आनंद वळसंगे, उपविभागप्रमुख प्रमोद प्रभू, राजेंद्र निकम, शाखाप्रमुख गणेश पाटकर, विशाल राहाड, मनोज चौधरी, अशोक सुळे, नीलेश निकम, उपशाखाप्रमुख आदित्य गावडे, वसंत जाधव, संजय उतेकर, जयसिंग वर्मा, किशोर गुप्ता, महिला उपविभाग संघटक संजना गुरव, माथाडी मुकादम शिवा वळंजू, मनोज गौड, दादा गोरड, समीर पाटोळे, युवा सेनेचे सोमेश शर्मा, विशाल गौड, रोहित भारद्वाज, लालू मेहता आणि सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.