सुट्टीच्यादिवशी वरखंड्यात भरली चित्रशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्टीच्यादिवशी वरखंड्यात भरली चित्रशाळा
सुट्टीच्यादिवशी वरखंड्यात भरली चित्रशाळा

सुट्टीच्यादिवशी वरखंड्यात भरली चित्रशाळा

sakal_logo
By

तलासरी, ता. २२ : शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा शाळेत सकाळ चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. माध्यमिक विद्यालय तलासरी, जि. प. शाळा गिरगाव आरजपाडा, जि. प. खुबाळे, ए. आर. के. इंग्लिश स्कूल तलासरी, एम.बी.बी.आय. शाळा, सी.बी.एस.सी. बोर्ड स्कूल, कार्डिनल पिमेंटा आदिवासी हायस्कूल, शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा अशा एकूण आठ शाळांनी सदर स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. तलासरी तालुक्यातील गिरगाव केंद्रातील कलाशिक्षक विनेश धोडी यांनी आपल्या शाळेतील २१ विद्यार्थ्यांना स्वखर्चाने खासगी वाहनाने वरखंडा केंद्रात स्पर्धेसाठी आणले होते. शाळेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
थंडीची तमा न बाळगता लाडक्या ‘सकाळ’ची चित्रकला स्पर्धा पूर्ण करण्यासाठी गावपाड्यावरून बालगोपाळांचा मेळा विद्यामंदिरात जमला होता. शहरी वातावरणापासून दूर डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या या बालकांनी अनुभवलेल्या विश्वातील कोरोनायोद्धा, क्रिकेट खेळणारी मुले, पाण्याखालील जीवसृष्टी, सजवलेला घोडा अशा आवडत्या चित्रांना पसंती दिली. यंदा प्रथमच पालकांनीदेखील वारली पेंटिंग, निसर्गचित्र आदी विषयांवर चित्र रेखाटण्याचा आनंद उपभोगला. पालकांनी या सुवर्णसंधीबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संतोष पागी, केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना शाळेतील सहशिक्षक यशवंत थापड, प्रमिला कुऱ्हाडे, अतुल पागी व शिपाई रमेश भुरकुड यांचे सहकार्य लाभले.