रामेश्वर विद्यामंदिरात विद्याथी रमले रंगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामेश्वर विद्यामंदिरात विद्याथी रमले रंगात
रामेश्वर विद्यामंदिरात विद्याथी रमले रंगात

रामेश्वर विद्यामंदिरात विद्याथी रमले रंगात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : वाकोल्यातील रामेश्वर विद्यामंदिरातील प्राथमिक आणि माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. सकाळपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट शाळेत होता. वर्ग शोधून देण्यापासून ते चित्रकलेचे कागद आणि कोणते चित्र काढायचे असे सर्व प्रश्न घेऊन ही लहान मुले दाखल झाले होते. प्राथमिक वर्गाच्या शिक्षिका नंदिनी नंदकुमार कदम यांनी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शिवाय, लहान मुलांना वर्गात बसवण्यापासून ते घरी जाईपर्यंत केंद्र प्रतिनिधी, शिक्षिका, शिक्षकांनी सहकार्य केले. सकाळी ९ वाजल्यापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली ते दहावीपर्यंतच्या जास्तीत जास्त मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. कलाशिक्षक जयेश कलमकर आणि मुख्याध्यापक उदय जोगळेकर यांनी मुलांचा स्पर्धेसाठी उत्साह वाढवला.