भिवंडीत चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
भिवंडीत चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

भिवंडीत चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

sakal_logo
By

भिवंडी, ता.२२(बातमीदार) : ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने भिवंडी विभागासाठी शहरातील पद्मश्री आण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि एनइएस शाळेत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. या स्पर्धेच्या आयोजनासाठी अण्णासाहेब जाधव विद्यालयातील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. मुख्याध्यापक सुधीर घागस यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गोसावी, शैलेंद्र सोनावणे, सतीश कनकुटला, प्रदीप पाटील, संगीता जाधव, सुवर्णा बनसोडे, स्वाती पाटील, कल्पना कासकर या शिक्षकवृंदासह कलाशिक्षक तारक पाटील, श्री हालारी ओसवाल स्कूलचे कलाशिक्षक मुरलीधर कुंभार, सेठ जुगीलाल हायस्कूलचे भानुदास मेटे यांनी उपस्थित राहून स्‍पर्धा यशस्‍वी होण्‍यासाठी परिश्रम घेतले. बिर्ला कॉलेजचे विद्यार्थी करण जाधव आणि विकास यादव यांनी पर्यवेक्षकाचे काम केले. एनइएस शाळेत मुख्याध्यापक शांताराम आगिवले यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पवार व संतोष पाठारी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पहिले तर पूजा हरिया, मैथिनी बाविस्कर, जिज्ञासा पाटील, प्रियांका शेटे, गौरी घुले, सुरश्री घांग्रेकर, नवनीता तडीगोपूला, सोनाली कामेरकर, इंदिरा कुंटला, विनायक बल्लेवार, स्नेहा काठवले, प्रमोद घोलप, आदित्य देसाई, दीपक खिसमतराव या शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बदलापुरात चिमुकले झाले तल्लीन
बदलापूर (बातमीदार) : बदलापुरात आदर्श विद्या मंदिर या केंद्रात आयोजित केलेल्या या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वत्र शालेय परीक्षांचे वातावरण असतानाही, अनेक हौशी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. आदर्श विद्यामंदिर या शाळेत विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी शाळेतील काही शिक्षक, शिपाई वर्ग व पालकांनी सहकार्य केले. कोरोनातील विस्मृतीत गेलेल्या आठवणी मुलांनी चित्रांच्या रुपात रेखाटल्या. कोरोना योद्धे, लस घेतलेले नागरिक, मास्क वापरताना फिरणारे नागरिक, समुद्री जीवन इतर अनेक विषयांवर मुलांनी चित्र काढले आणि त्यात स्वतः च्या कल्पकतेने रंग भरले.