वरळी विभागात यंदाही उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळी विभागात यंदाही उत्साह
वरळी विभागात यंदाही उत्साह

वरळी विभागात यंदाही उत्साह

sakal_logo
By

वरळी विभागात यंदाही उत्साह
वरळी येथील बीडीडी चाळीतील परिसरात असलेल्या मराठा हायस्कूलमध्ये मुलांमध्ये चित्रकला स्पर्धेचा यंदाही उत्साह पाहायला मिळाला. लहान मुलांच्या अ आणि ब विभागात (पहिली ते चौथी) मुलांची संख्या अधिक होती. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक अर्चना मंचे, मनीषा जोशी, सायली सकपाळ, शीतल वेमुला, मनीषा लोहार, सुमित नाटेकर, सारिका पाल आणि समीर तांबोळी यांनी मोलाचे सहकार्य केले. विजय पवार हे मदतनीस होते; तर मुख्याध्यापिका सुशीला जडयार यांनीही उपस्थित राहून स्पर्धेवर लक्ष ठेवले. हाताल बँडेज असतानाही एक मुलगा त्याच हाताने चित्र काढून स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करत होता.