बेकायदेशीर ऑर्केस्ट्रावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदेशीर ऑर्केस्ट्रावर छापा
बेकायदेशीर ऑर्केस्ट्रावर छापा

बेकायदेशीर ऑर्केस्ट्रावर छापा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : मुंबईतील अंधेरीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने कारवाई करत ३५ जणांना अटक केली. तसेच यातील २२ महिलांची सुटका करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने शनिवारी (ता. २१) रात्री ११.१५ च्या सुमारास घाटकोपर येथील पंत नगर परिसरातील बारवर छापा टाकला. पोलिसांनी छाप्यादरम्यान ५७ हजार रुपये रोख आणि संगणक उपकरणे जप्त केली आहेत.

पोलिसांच्या कारवाईत २२ महिलांची सुटका करण्यात आली आहे. बार मॅनेजर, कॅशियर, सात वेटर आणि १३ ग्राहकांसह ३५ जणांना अटक करण्यात आली. भारतीय दंड संहिता आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बाररूममध्ये अश्लील नृत्य करण्यास महाराष्ट्र प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणारा कायदा २०१६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.