विक्रमगडमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात
विक्रमगडमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

विक्रमगडमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : विक्रमगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच विक्रमगड हायस्कूल येथे करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‍घाटन पंचायत समितीचे सभापती यशवंत कनोजा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार, गटविकास अधिकारी हनुमंत राव दोडके, गटशिक्षणाधिकारी बापू शिनगारे, पंचायत समिती सदस्या नम्रता गोवारी, विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी अजय साबळे, विस्तार अधिकारी कामडी, विक्रमगड हायस्कूल प्राचार्य अजित घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र ठाकरे यांनी; तर केंद्रप्रमुख किरण रोडे यांनी आभार मानले.