उल्हासनगर येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
उल्हासनगर येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

उल्हासनगर येथे चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : विविध रंगांची उधळण करत बालचित्रकारांनी रविवारी सकाळ माध्यम समूह आयोजित चित्रकला स्पर्धेचा आनंद लुटला. सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेला उल्हासनगर येथून चांगला प्रतिसाद मिळाला. येथील नॅशनल हायस्कूलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनयना कटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बबन नागले, संजीव नेहते, रवींद्र निकम, रवींद्र भोई, शिवाजी घजर, सुनील उबाळे, अश्विनी ठाकूर या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
--------------------------
शहापुरात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
शहापूर, ता. २३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात ग. वि. खाडे विद्यालयात ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘पाण्याखालची जीवसृष्टी’, ‘कोरोना योद्धे’, ‘क्रिकेटचा सामना’ यासारख्या विषयांना विद्यार्थ्यांनी अधिक प्राधान्य दिलेले दिसले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ज्ञानेश्वर तळपाडे तसेच कलाशिक्षक किरण सोनावणे, विजय पिलकर, दिलीप गायकवाड, नारळे व मनीष व्यापारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी ‘सकाळ’ समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीत व आनंदाच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली.
----------------------------------------------------------------
आर. के. पालवी विद्यामंदिरात विद्यार्थी मग्‍न
पडघा : आर. के. पालवी विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय केंद्रात आयोजित झालेल्या ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वत्र शालेय परीक्षांचे वातावरण असतानाही अनेक विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेसाठी शाळेतील कला शिक्षक कैलाश तांबडे व शिक्षक भगवान पाटील, जितेंद्र पाळधी, दिलीप भोईर, श्वेता अहिरे, वैशाली ठाणगे, रुबी, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिपाई व पालकांनी सहकार्य केले. या स्पर्धेला नियोजित वेळेपूर्वीच विद्यार्थी चित्रकलेचे साहित्य घेऊन दाखल झाले होते. शाळेचे प्राचार्य रवींद्र पालवी यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांना शुभेच्छा दिल्या.
----------------------------------------------
चिमुकले रंगले रंगात
डोंबिवली : ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला येथील चंद्रेश लोढा मेमोरियल स्कूल, लोढा हेवन, निळजे आणि रामभाऊ भिसे शाळा, निळजे या दोन शाळांतील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. चित्रे काढताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. चंद्रेश लोढा मेमोरियल शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला शिक्षिका संगीता सूर्यवंशी, अनुराधा अय्यर, स्मिता देशमुख, स्मिता राजीव, कल्पना नायडू, दीपा गुरनानी, ममता कोटियल, क्रितिका नाईक, लिलाक्षी सुरेश आमीन या शिक्षकांनी सहकार्य केले तसेच रामभाऊ भिसे शाळेतील मनीषा महादेव गायकवाड, जयश्री पोटावडे आणि प्रशांत सपकाळ या शिक्षकांचेही सहकार्य लाभले.