नवउद्योजकांनी जोखमीची तयारी ठेवावी ः मीनल मोहाडीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवउद्योजकांनी जोखमीची तयारी ठेवावी ः मीनल मोहाडीकर
नवउद्योजकांनी जोखमीची तयारी ठेवावी ः मीनल मोहाडीकर

नवउद्योजकांनी जोखमीची तयारी ठेवावी ः मीनल मोहाडीकर

sakal_logo
By

मुलुंड, ता. २३ (बातमीदार) ः नवउद्योजकांनी जोखमीची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले.
विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता : नव्या क्षितिजांचे आव्हान’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषद नुकतीच झाली, त्‍या वेळी त्‍या बोलत होत्‍या.
महाविद्यालयाच्या ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता’ विभागाने या अभ्यास परिषदेचे आयोजन केले होते. यात मुंबई विद्यापीठाचा एमयू आयडियाज- इन्नोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेस विभाग, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अटल इनक्युबेशन केंद्र, गर्जे मराठी तसेच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅमिली-मॅनेज्ड बिझनेस हे सहआयोजक म्हणून सहभागी झाले होते.
मीनल मोहाडीकर यांनी उद्योजक होण्याच्या असंख्य संधी आज उपलब्ध असल्याचे सांगून त्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहन तरुणांना केले. यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करत सतत तयार राहायला हवे, ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’ त्यांना सर्व प्रकारचे साह्य करायला नेहमीच तत्पर आहे असे त्या म्हणाल्या. अनेक यशस्वी नवउद्योजकांची उदाहरणे देत त्यांनी आर्थिक पाठबळाबरोबरच जोखीम पत्करण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची तयारी असणे महत्त्वाचे असल्याचे संगितले.
अभ्यास परिषदेमध्‍ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, भारतीय महिला चेंबर ऑफ कॉमर्सच्या भारत-युरोपीय संघ व्यवसाय परिषदेच्या अध्यक्षा ॲडा डायंडो तसेच संयोजक डॉ. अर्चना प्रभुदेसाई व्यासपीठावर उपस्थित होत्या. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी परिषदेच्या आयोजकांना शुभेच्छा देताना सतत काही तरी शिकत राहणे हेही एक अत्यावश्यक कौशल्य असल्याचे प्रतिपादन केले. ॲड. डायंडो यानी आपल्या बीजभाषणात भारत-युरोप व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यात महिला उद्योजक कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात याचा आढावा घेतला. डॉ. सुजा रॉय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर परिषदेच्या समन्वयक प्रा. अर्चना नायर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या अभ्यास परिषदेत जगभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.