Tue, Jan 31, 2023

कळव्यात भव्य तांदूळ महोत्सव
कळव्यात भव्य तांदूळ महोत्सव
Published on : 23 January 2023, 12:13 pm
कळवा, ता. २३ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील ७८ वर्षे परंपरा असलेल्या कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने १७ ते २५ जानेवारी या कालावधीत कळव्यातील गावदेवी मैदानात तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रमेश बांगर व कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी अध्यक्ष नारायण गावंड, माजी नगरसेविका प्रमिला केणी तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. या तांदूळ महोत्सवात इंद्रायणी, सोनपरी, वाडा कोलम, बासमती, लाचकारी या तांदळांबरोबरच उकडा तांदूळ, चंद्रपूर व नागपूर कोलम यासारख्या १०० पेक्षा अधिक प्रकारचे नवीन व जुने तांदूळ उपलब्ध असून वर्षभर साठवणुकीच्या स्वस्त दरात तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन संस्थेने कळवा परिसरातील नागरिकांना केले आहे.