
मुले रंगली चित्रकला स्पर्धेत
मुंबई, ता. २३ ः विक्रोळी, टागोर नगर येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दशरथ अर्जुन बटा माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये सकाळ चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या वेळी प्रतिभा दशरथ बटा प्राथमिक विद्यालय, कमल वासुदेव वायकोळे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जयदास शेळके, अवधेश फाटक, मनस्वी कोयंडे, भिवा येजरे यांनी शाळेतील विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न केले. या स्पर्धेसाठी शाळेतील चंद्रकांत येजरे, संगीता जाधव, विविधा ओव्हाळ, सिद्धी शिंदे, संजना साईल, नीता कांदळगावकर, पूनम पाटील या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग व्हावे त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळेत उपस्थित राहून स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यास सहकार्य केले. शाळेचे कलाशिक्षक भीमराव मासाळ यांनी चांगले नियोजन केले होते.