‘साहेब मी गद्दार नाही’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साहेब मी गद्दार नाही’
‘साहेब मी गद्दार नाही’

‘साहेब मी गद्दार नाही’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण शहरात शिवसेना शहर शाखेच्या वतीने बॅनर झळकावण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादन करणारी एक जाहिरात प्रसिद्ध केली. त्यातून ४० आमदारांना सूचक असा इशारादेखील देण्यात आला आहे. ठाकरे गटाने हा इशारा देणारे बॅनर्स आता कल्याण शहरात झळकवले असून दिवसभर या बॅनरची एकच चर्चा रंगली होती. साहेब, मी गद्दार नाही..., असे म्हणत ठाकरे गटाचे शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करताना दिसून आले.
शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. २३) शहरात अभिवादनपर कार्यक्रम, तसेच रक्तदान शिबिर, अन्नधान्य, फळ वाटप, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांना खासदार संजय राऊत यांनी अभिवादन केले असून त्यांच्या त्या अनोख्या अभिवादनाची चर्चा राजकीय वर्तुळात, तसेच समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. राऊत यांच्या या अनोख्या अभिवादनाचे बॅनर शिवसैनिकांनी कल्याणमध्ये उभे केले असून त्याची चर्चा आता शहरात रंगत आहे.

------------------
नव्या उमेदीने उभे राहू
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदार गेले. शिंदे गटासोबत गेलेल्या ४० आमदारांना गाडून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहू, असे राऊत यांनी म्हटले आहे. याच संदेशाचे बॅनर आता कल्याण शहरातील शिवसेना शाखेच्या वतीने लावण्यात आले आहेत. या बॅनरवर ‘‘साहेब, मी गद्दार नाही... गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले, याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल.’’ हा संदेश देण्यात आला आहे. हा फलक कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर लावण्यात आला असून त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.