‘ऋषी वाल्मिकी’च्या चिमुकल्यांनी केली रंगांची उधळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ऋषी वाल्मिकी’च्या चिमुकल्यांनी केली रंगांची उधळण
‘ऋषी वाल्मिकी’च्या चिमुकल्यांनी केली रंगांची उधळण

‘ऋषी वाल्मिकी’च्या चिमुकल्यांनी केली रंगांची उधळण

sakal_logo
By

वसई, ता. २३ (बातमीदार) : नायगाव येथी ऋषी वाल्मिकी शाळेने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या ‘सकाळ बालचित्रकला’ स्पर्धेत सहभाग नोंदवला. या ठिकाणी सकाळपासून स्पर्धकांची गर्दी झाली होती. या चिमुकल्यांनी रंगांची उधळण करत विविध विषयांवर चित्र काढली.
नायगाव येथे ऋषी वाल्मिकी शाळा ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांत सहभागी होत असते. यंदाच्या बालचित्रकाला स्पर्धेतदेखील येथील संस्थापक, शिक्षकांनी सहभाग घेण्यासाठी तयारी दाखवली. या उपकेंद्रावर सकाळपासून विद्यार्थी व पालकांची रीघ लागली होती. शिक्षक व शाळा व्यवस्थापकांनी पूर्ण जबाबदारीने चित्रकला स्पर्धा यशस्वी करून दाखवली. यावेळी नायगाव येथील ऋषी वाल्मिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. शाळेचे संस्थापक रवींद्र भाटकर, चित्रा भाटकर यांनी भेट देत ‘सकाळ’ उपक्रमाचे कौतुक केले; तर मुख्याध्यापिका अरुणा नलावडे, शिक्षक बंडू पवार, संजय नारखडे, नेहा डोंगरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्याची भूमिका पार पाडली. ‘सकाळ’ समूह चित्रकला स्पर्धा आयोजित करत असते. त्यामुळे अनेक मुलांना निसर्ग, आजूबाजूच्या घडामोडी, तसेच जनजागृतीत सहभाग घेता येतो. त्यामुळे या स्पर्धेत सहभाग घेण्याचे ठरवले. त्याला विद्यार्थ्यांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला, अशी कलाशिक्षक बंडू पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
---------------
वसई : नायगाव ऋषी वाल्मिकी शाळेत चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला.