विद्यार्थ्यांनी अनुभवली आदिवासी संस्कृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी अनुभवली आदिवासी संस्कृती
विद्यार्थ्यांनी अनुभवली आदिवासी संस्कृती

विद्यार्थ्यांनी अनुभवली आदिवासी संस्कृती

sakal_logo
By

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : टोकावडे येथील जयवंतराव पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे समसंस्कार शिबिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वालीवरे गावात पार पडले. या काळात विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती व त्यांच्या जीवन शैलीचा अभ्यास केला.
मुरबाड तालुक्यातील हे शेवटचे गाव शंभर टक्के आदिवासी वस्तीचे असूनही एक चांगले खेडे म्हणून वालीवरे गाव परिचित आहे. या गावातील संस्कृती विद्यार्थ्यांना जवळून अनुभवता आली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, श्रमदान केले. नजीकच्या गावांना भेटी देऊन तेथील लोकांशी संवाद साधला. शिबिराच्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांचा मुक्काम वालीवरे येथील आश्रमशाळेत होता. आमदार गोटीराम पवार यांनी शिबिराचे उद्‍घाटन केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसेवा शिक्षण संस्था अध्यक्ष बी. एम. पवार, जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक हरिश्चंद्र इसामे व मुरलीधर दळवी तसेच प्राचार्य मधुकर डोंगरे उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी विशाल देसले व सोनाली शिंदे यांनी सात दिवस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली बंगाल व जयेश बोंबे यांनी केले. कुणाल शिंदे यांनी आभार मानले. विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून दीपक वाघ व निकिता बंगाल यांनी मनोगत व्यक्त केले.