दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

Published on

कासा, ता. २५ (बातमीदार) ः दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना डहाणू तालुक्यातील कासा - सायवन राज्यमार्गावर घडली. यात एकाचा मृत्यू झाला; तर एक जण जखमी झाला. सुभाष विश्नोई असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

घरोघरी जाऊन गॅसदुरुस्ती करणारे सुभाष विश्नोई हे २१ जानेवारी रोजी आपले काम आटोपून कासा येथे येण्यासाठी निघाले होते. धरमपूर गावच्या हद्दीत ते आले असता आकाश भंडार यांच्या दुचाकीची विश्नोई यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. यात दोन्ही दुचाकी खाली पडल्या. भंडार यांच्या दुचाकीवर त्यांच्या पत्नी जयेंदा भंडार व लहान मुलगी स्नेहल होत्या. त्यांनाही याचा मार लागला. या धडकेत सुभाष विश्नोई यांना गंभीर मार बसला. त्यांना सेल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com