विजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू
विजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

ठाणे, ता. २५ (वार्ताहर) ः महावितरणच्या विद्युत खांबावर चढून विद्युत जोडणीचे काम करणाऱ्या तरुणाचा विजेचा तीव्र झटका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली. अशी माहिती ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महावितरणच्या विद्युत दुरुस्तीच्या कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडे महेश सुरवसे (वय ३४) हा काम करीत होता. मंगळवारी दुरुस्तीचे काम करीत असताना सुरवसे हा विद्युत खांबावर चढला होता. त्यावेळी त्याला विजेचा तीव्र धक्का लागला. यात सुरवसे याचा मृत्यू झाला. याची माहिती समजताच घटनास्थळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि वर्तकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहिले. महेश सुरवसे याचा मृतदेह वर्तकनगर पोलिसांनी पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे पाठवला.