शांताबाई कांबळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांताबाई कांबळे यांचे निधन
शांताबाई कांबळे यांचे निधन

शांताबाई कांबळे यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कृष्णाजी कांबळे (वय १००) यांचे येथे बुधवारी (ता. २५) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा चंद्रकांत आणि मुलगी गौरी तिरमारे आहेत. दलित पँथरचे दिवंगत नेते प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.

शांताबाई गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात मुलीच्या घरी होत्या. झोपेतच त्यांचे निधन झाल्याचे सकाळी ७ च्या सुमारास कुटुंबीयांच्या लक्षात आले. गेल्या वर्षी १ मार्च रोजी त्यांच्या शंभरीचा कार्यक्रम पुण्यात झाला होता. त्याला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासह दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे झाला. शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ रोजी नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या. १९८१ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे त्यांचे १७ जून १९८६ रोजी प्रकाशित झालेले आत्मवृत्त विशेष गाजले. ‘नाजुका’ या नावाने मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्मकथन सादर झाले. त्यानंतर फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत पुस्तकरूपाने अनुवाद प्रसिद्ध झाले. ‘फेमिना’ मासिकातून ते इंग्रजीत अनुवादित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तिरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला. शांताबाईंच्या पार्थिवावर नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे अंत्यसंस्कार झाले.