दुचाकी अपघातात तरुण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी अपघातात तरुण जखमी
दुचाकी अपघातात तरुण जखमी

दुचाकी अपघातात तरुण जखमी

sakal_logo
By

पोलादपूर (बातमीदार)ः महाड पोलादपूरच्या मध्यभागी असलेल्या शिंदेकोंड गावच्या हद्दीमध्ये दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
महाड पोलादपूर दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्त्यावर दुभाजक उभारले आहेत. या मार्गांवर सध्या दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आले. त्यामुळे हा प्रकार अपघातांना निमंत्रण ठरत आहे. रात्रीच्या वेळेस अनेकदा या दुभाजकांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. सोमवारी सकाळी करण वाडकर नामक दुचाकी स्वाराचा देखील महाडच्या दिशेने जात असताना दुभाजकाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे महामार्गावर दिशादर्शक बसवण्याची मागणी होत आहे.