अंबरनाथच्‍या अग्निशमन दलप्रमुखांचा सन्‍मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथच्‍या अग्निशमन दलप्रमुखांचा सन्‍मान
अंबरनाथच्‍या अग्निशमन दलप्रमुखांचा सन्‍मान

अंबरनाथच्‍या अग्निशमन दलप्रमुखांचा सन्‍मान

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ३१ (बातमीदार) : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांना मानद डॉक्टरेट आणि महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईच्या जुहू येथील हॉटेल हयात येथे मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा तसेच अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे, पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सोनोने यांना डॉक्टरेट आणि महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र वेल्फेअर सोसायटी असोसिएशन, मुंबई आणि रेड एंट यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट ऑफ इन्ट्रप्रेनियर आणि मॅनेजमेंट स्टडीज युनिव्हर्सिटी कडून आग आणि अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन या विषयात सोनोने यांना मानद डॉक्टरेट पदवी आणि महाराष्ट्र रत्न २०२३ हे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
गेल्या १९ वर्षांपासून भागवत सोनोने अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची अग्निसुरक्षा जबाबदारी सांभाळत आहेत. आग, नैसर्गिक आपत्ती निवारण अथवा त्याविषयी त्‍यांनी ‍जनजागृती केली आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवांप्रमाणे अग्निशमन विभागदेखील जीवाची पर्वा न करता लढा देत होता, अतिवृष्टीच्या काळात बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात सोनोने यांच्या पथकाने महत्त्‍वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार आणि पदवीचा सन्मान प्राप्त करणारे भागवत सोनोने हे ठाणे जिल्‍ह्यातील पहिले अग्निशमन अधिकारी ठरले आहेत.