२४ तासांत आरोपी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२४ तासांत आरोपी गजाआड
२४ तासांत आरोपी गजाआड

२४ तासांत आरोपी गजाआड

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता.३१(वार्ताहर)ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भाताणजवळ एका कारचालकाला सहाजणांच्या टोळीने लुबाडले होते. यावेळी गाडीतील एक लाख ९७ हजार रुपये आणि मोबाईल, पॅन तसेच आधार कार्डसह दोन लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरण्यात आला होता. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सहाजणांच्या एका टोळीने गाडी चालकाला लुटण्याच्या इराद्याने धडक देत गाडीतील मुद्देमाल चोरण्यात आला होता. भाताणजवळ ही घटना घडली असल्याने याप्रकरणी पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी गाडीतील आरोपी घटनेनंतर सातारा दिशेला रवाना झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. तसेच टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅंनिंगमुळे संबंधित गाडीचा रजिस्टर क्रमांक पोलिसांना मिळाला होता. या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मोबाईल क्रमांक प्राप्त केला. पण खेड-शिवापूर टोल नाक्यानंतर पोलिसांना गुन्हेगारांचा मागोवा घेण्याबाबत अडचणी येत होत्या. त्यामुळे गेलेली गाडी परत येईल, असा अंदाज पकडून पोलिसांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवला होता. यावेळी चोरी करून गेलेले वाहन परत मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह पोलिसांनी सहा आरोपींनी अटक केली आहे.
-----------------------------------
अटक केलेल्या आरोपींची नावे
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एम.एच.०२ ईके-००५३ क्रमांकाची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच याप्रकरणी राजू पुकळे (२५, रा.कळंबोली), प्रमोद कोकरे (२८, रा.कोपरखैरणे), मायाप्पा वळकुंदे (२४, रा.कळंबोली), किरण सरगर (२८, रा. कामोठे), अशोक पाटील (२३, रा.कळंबोली), संदीप कोकरे (२३, व्यवसाय - रा. कुर्ला, मुंबई) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे.