बांधकाम विभागाकडून ठेकेदाराची पाठराखण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम विभागाकडून ठेकेदाराची पाठराखण
बांधकाम विभागाकडून ठेकेदाराची पाठराखण

बांधकाम विभागाकडून ठेकेदाराची पाठराखण

sakal_logo
By

नेरळ, ता. ३१ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील नेरळ कशेळे राज्य मार्गावरील कुंभे फाटा ते कोलिवली गावादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्या माध्यमातून डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे; मात्र हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाकस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष वैखरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली; पण हे काम उत्तम होत असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला असल्याची माहिती वैखरे यांनी दिली. त्यामुळे बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ कशेळे भिमाशंकर घाटरस्ता राज्य मार्ग -१०३ या रस्त्याची काही भागात मोठी दुर्दशा झाली आहे. रामाची वाडीपासून काही अंतरावर वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी शासनाकडून १ कोटी २१ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर कामाचे भूमिपूजन हे कर्जत -खालापूर विधानसभेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. सदर राज्य मार्गावरील कुंभार फाटा ते वाकस ग्रामपंचायत हद्दीतील कोलिवली गावादरम्यान डांबरीकरणाचे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वाकस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष वैखरे यांची तक्रार आहे. खराब कामामुळे रस्ता टिकणार नसल्याने त्याचा त्रास हा ग्रामस्थांना होणार आहे, असे वैखरे म्हणाले. नेरळ-कशेळे राज्य मार्गावरील रस्ता जिथे खराब झाला तिथे कामाचा पत्ताच नाही, असा आरोप वैखरे यांनी केला.