शेअर बाजारात अल्प वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात अल्प वाढ
शेअर बाजारात अल्प वाढ

शेअर बाजारात अल्प वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : हिंडेनबर्ग-अदाणीच्या धक्क्यातून सावरत असतानाच बुधवारच्या अर्थसंकल्पाची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने भारतीय शेअर बाजारात आज किरकोळ तेजी आली. सेन्सेक्स ४९.४९ अंश; तर निफ्टी १३.२० अंशानी वाढला.

कालच्या धसक्यामुळे भारतीय शेअर बाजारांची सुरुवात आजही नरम गरम झाली. सुरुवातीलाच तोटा दाखवल्यानंतर दिवसभरात खालच्या भावात खरेदी झाल्यामुळे त्यात किरकोळ वाढ झाली; मात्र तरी सेन्सेक्स व निफ्टीला फार नफा दाखवता आला नाही. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ५९,५४९.९० अंशांवर; तर निफ्टी १७,६६२.१५ अंशावर स्थिरावला.

आज वाहननिर्मिती कंपन्यांच्या शेअरनी चांगला नफा करून दिला; तर आयटी क्षेत्राचे शेअर पडले. आज एनएससीमधील १,५५६ शेअरचे भाव नफ्यात होते; तर फक्त ४६६ शेअरचे भाव तोटा दाखवत होते. सेन्सेक्सच्या प्रमुख ३० शेअरपैकी आज बजाज फायनान्स सव्वादोन टक्के तसेच टीसीएस आणि टेक महिंद्रा दोन टक्के घसरले. एशियन पेंट, सन फार्मा दीड टक्का तसेच नेस्ले आणि एचडीएफसी एक टक्का पडले. वाढलेल्या शेअरपैकी आयटीसी दोन टक्के वाढून ३५२ पर्यंत गेला. महिंद्र आणि महिंद्र साडेतीन टक्के, स्टेट बँक तीन टक्के; तर टाटा मोटर्स दोन टक्के वाढला. टायटन दोन टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या शेअरच्या भावात तीन टक्के वाढ झाली.