Wed, March 22, 2023

दारूची वाहतूक रोखून सात लाखांचा माल जप्त
दारूची वाहतूक रोखून सात लाखांचा माल जप्त
Published on : 31 January 2023, 3:31 am
मनोर, ता. ३१ ः उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्यातील किन्हवली पिंपळशेत रस्त्यावर सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नाकाबंदी लावून केलेल्या कारवाईत कारमधून सुरू असलेली दमण बनावटीच्या दारूची वाहतूक रोखली. कारवाईदरम्यान कारसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाला अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाचे नाव विलास यशवंत बात्रा (वय ३९) असे आहे. कारमध्ये आढळलेल्या ३० बॉक्समध्ये ३४३.२ लिटर दमण बनावटीचे मद्य होते. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.