
मुंबई-अबुधाबी विमानात मद्यधुंद महिलेचा गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई-अबुधाबी विमानात मद्याच्या नशेत महिलेने गोंधळ घालत क्रू मेंबरला मारहाण केल्याचा प्रकार रविवारी (ता. २९) रात्री घडला आहे. त्यानुसार सहार पोलिसांनी ४५ वर्षीय इटालियन महिलेला अटक केली आहे. पाओला पेरुशियो असे या महिलेच नाव असून, तिला २५ हजार दंड ठोठावून जामिनावर सोडण्यात आले. ही महिला मद्यधुंद अवस्थेत आपली सीट सोडून बिझनेस क्लासमधील सीटवर जाऊन बसली. क्रू मेम्बरने तिला रोखले असता तिने मारहाण केली. या वेळी दुसऱ्या क्रू मेंबरने रोखण्याचा प्रयत्न केला असता ही महिला तिच्या तोंडावर थुंकली आणि कपडे काढून विमानात फिरू लागली. कॅप्टनच्या निर्देशानुसार या महिला प्रवाशाला रोखून तिला कपडे घालण्यात आले. यानंतर विमान लँड होईपर्यंत तिला सीटला बांधून ठेवण्यात आले. पोलिसांनी महिलेला अटक केल्यानंतर तिचा पासपोर्टही जप्त केला.