

दिवा, ता. २ (बातमीदार) : अभ्युदय को. ऑप. बँक दिवा शाखा व सिद्धांत पार्क को. ऑप. हौ. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा पार पडली. चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना चित्रकलेचे पेपर, रंगीत खडू व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत ६० मुलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील लहान मुलांच्या गटातील प्रथम रिहान पाटील, द्वितीय हंसी पाटील तसेच तृतीय हर्षिता प्रजापती यांना मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. मोठ्या गटातील प्रथम स्पर्श लबदे, द्वितीय किया समंता व तृतीय रिम्शा साळवी या विजेत्यांना दिवा शाखेचे सहव्यवस्थापक रविंद्र धूरी व सिद्धांत पार्क सोसायटीचे विकास भगत यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभ्युदय बँकेतर्फे अधिकारी रविंद्र विट्ठल धूरी, विनोद धूरत, वैशाली देवेंद्र पाटील, प्रवीण भोईर, सुधाकर रोहकले, हेमंत वेखंडे, प्रदीप बांगर, नितिन चौधरी, अविनाश इसामे, जयदीप पवार, राजेश भोंडीवले, वैशाली पाटील, अनिल साईल, छगन रसाळ आदी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.