मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम
मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम

मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम

sakal_logo
By

मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम
सिरो सर्वेक्षण; बुस्टर डोसची मात्रा ठरली आरोग्यादायी
सकाळ वृत्तसेव
मुंबई, ता. ४ : कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यासाठी तिसरा डोस अर्थात बुस्टर डोसची मात्रा घेतली अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती आरोग्यास उपयुक्त ठरली आहे. तर कोरोना बाधित रुग्णांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या त्यांची रोगप्रतिकारक शक्ती समाधानकारक आहे. पालिकेच्या सहाव्या सिरो सर्वेक्षणात पाॅझिटिव्ह दर ९९.९० टक्के आढळून आला आहे. त्यामुळे सिरो सर्वेक्षणाचा अहवाल  मुंबईकरांसाठी दिलासादायक असल्‍याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यात ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिलांचा समावेश होता.
मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. कोरोना बाधित रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली अथवा वाढली याचा अभ्यास करण्यासाठी सिरो सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. 
या सिरोसर्व्हेत महानगरपालिकेचे आरोग्य सेवा कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन विभाग कर्मचारी आणि बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम विभाग) कर्मचा-यांमध्ये कोविड विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण करणारी प्रति-पिंडांची पातळी आजमावणे आणि कोविड व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा प्रति-पिंडांच्या पातळीवर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात ९९.९ टक्के रोगप्रतिकारक शक्ती
सर्वेक्षणात टप्पा १ मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तिंपैकी ९९.९ टक्के व्यक्तिंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणारी प्रतिपिंडे आढळून आली होती. तर ज्या सहभागी झालेल्यांनी दोन डोस घेतले होते, त्यांच्या तुलनेत वर्धक-मात्रा (प्रिकॉशनरी डोस) घेतलेल्या व्यक्तिंमध्ये प्रतिपिंडे तुलनेने अधिक आढळली होती.

फ्रंट लाईन व आरोग्य सेवा कर्मचारी! 
सिरोसर्व्हेचा दुसरा टप्पा ६ महिन्यांनंतर करण्यात आला. यात पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यक्तिंची पातळी पुन्हा मोजण्यात आली. या दुस-या टप्प्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.पहिल्या टप्प्यामध्ये ३,०९९ व्यक्ती सहभागी होत्या. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये २,७३३  (८८ टक्के ) सहभागी व्यक्तिंचा पाठपुरवठा शक्य झाला, ज्यातील ५० टक्के फ्रंटलाइन कर्मचारी आणि ५० टक्के आरोग्य सेवा कर्मचारी होते. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २,७३३ व्यक्तिंपैकी ५९ टक्के व्यक्ती हे २५ ते ४५ वर्ष वयोगटातील होते, तर ४१ टक्के व्यक्ती हे ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील होते. यातील  ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तिंची सरासरी प्रतिपिंड संख्या ही इतर वयोगटातील व्यक्तिंपेक्षा अधिक होती.