द्वेषविरहित विचारांसाठी भारत जोडो यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्वेषविरहित विचारांसाठी भारत जोडो यात्रा
द्वेषविरहित विचारांसाठी भारत जोडो यात्रा

द्वेषविरहित विचारांसाठी भारत जोडो यात्रा

sakal_logo
By

डहाणू, ता. ४ (बातमीदार) : काँग्रेसने काढलेली ‘भारत जोडो’ यात्रा ही निवडणुकीसाठी नाही तर विविधतेतून एकता साधून समाजासमाजात पसरवण्यात येत असलेली द्वेषभावना संपवून, द्वेषविरहित विचारधारा रुजवण्यासाठी होती, असे प्रतिपादन कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी केले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होऊन तब्बल १४४ दिवसांत चार हजार ८० किलोमीटरचे अंतर पायी चालून परत वाणगाव येथे परतलेल्या सत्यम ठाकूर यांचा महाविकास आघाडीतर्फे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी कॅप्टन सत्यम ठाकूर भावनाविवश होऊन आपले मनोगत व्यक्त करत होते.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंद ठाकूर होते. या वेळी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रफुल पाटील, डहाणू तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. काशिनाथ चौधरी, पराग पष्टे, मनोहर दांडेकर, पिंटू गहला, यशवंत ठाकूर, विजय पाटील, नरेश कंसारा, ब्रिजेश ठाकूर, सुरेंद्र पाटील, मिलिंद पाटील, मधुकर चौधरी, गोवर्धन बारी, सुनीता भावर, राजेश अधिकारी, मोईन शेख, सुधीर नम आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी कॅप्टन सत्यम ठाकूर यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पहार, शाल, मानपत्र आणि ट्रॉफी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. देशात सामाजिक बांधिलकी आणि प्रेमभावना जपण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रसिद्धीमाध्यमांनी फारशी प्रसिद्धी दिली नसल्याची खंत ॲड. काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त करून काँग्रेसने आदिवासी समाजाला खूप काही दिले असल्याची भावना व्यक्त केली.