Thur, March 30, 2023

उल्हासनगरातील शारदा विद्यालयाला कुलरची भेट
उल्हासनगरातील शारदा विद्यालयाला कुलरची भेट
Published on : 6 February 2023, 11:38 am
उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण लोकसभा क्षेत्राचा ऐतिहासिक विकास करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या युवासेनेचे उल्हासनगरातील शारदा विद्यालयाला थंड पाण्याच्या कुलरची गिफ्ट दिली आहे. युवासेनेचे बाळा श्रीखंडे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या थंड पाण्याच्या कुलरचे माजी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. केक कापून व खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे संस्थापक अध्यक्ष एल.के.शिंदे, खजिनदार बाळासाहेब शिंदे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव, शाळेच्या मुख्याध्यापिका झुंजारराव, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.