ठाण्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
ठाण्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

ठाण्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

sakal_logo
By

कळवा, ता. ६ (बातमीदार) : ठाण्यातील पाचपाखाडी भागात सुरू झालेल्या निमाई बॉर्निओ या हॉस्पिटलने ठाण्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या २५ महिलांच्या मातृत्वाचा सन्मान राखण्याच्या हेतूने सत्कार करून त्यांचा सन्मान राखला आहे. कला, पोलिस, वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या वेळी ठाणे परिसरातील महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्याला २५ हजारांची पैठणी बक्षिस म्हणून देण्यात आली. बाळ जन्माला यायच्या आधीपासून त्याची पूर्वतयारी ते बाळंतपण व त्यानंतरची बाळाची काळजी घेणारे एक सुसज्ज बर्थींग सेंटर पाचपाखाडी भागात बॉर्नीओ नावाने सुरू झाले आहे, अशी माहिती निमाई बॉर्निओचे मॅनेजिग डायरेक्टर डॉ. संतोष मद्रेवार यानी दिली.