जोगेश्‍वरीत रक्‍तदान शिबिर

जोगेश्‍वरीत रक्‍तदान शिबिर

जोगेश्वरी, ता. ८ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर येथील भूमी वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश गवाणकर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. रविवारी (ता. ५) सर्वोदय नगर नाका येथे हे शिबिर पार पडले. या संस्थेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविले जातात. या शिबिरात एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आमदार रवींद्र वायकर, शिवसेनेचे उपनेते अमोल किर्तीकर आणि मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. श्री बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले होते; तसेच डॉ. दीपक देसाई यांनी या वेळी विशेष सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com