मुलुंडमध्ये शहीद कुटुंबाचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये शहीद कुटुंबाचा गौरव
मुलुंडमध्ये शहीद कुटुंबाचा गौरव

मुलुंडमध्ये शहीद कुटुंबाचा गौरव

sakal_logo
By

मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा प्रेरणा फाऊंडेशनने सलग सहाव्या वर्षी कालिदास मैदान, येथे शहीद परिवार गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित सर्व लोक देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसले. भारतमातेचे चित्रण आणि दिल्लीतील समर स्मारक (युद्ध स्मारक), अमर जवान स्मारक, इंडिया गेट, शहीद सैनिकांच्या छायाचित्रांसह आणि त्यांच्या संक्षिप्त परिचयाची भव्य प्रतिकृती या समारंभासाठी उभारण्यात आली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने अलीकडेच भारतातील २१ परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर भारतातील २१ बेटांची नावे दिली आहेत आणि या सर्व २१ परमवीर चक्र विजेत्यांना शहीद परिवार गौरव समारंभात गौरविण्यात आले.
भारतीय लष्कराने वापरलेल्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. युवा प्रेरणा फाऊंडेशन आणि व्हिजन स्मार्ट इंडिया यांनी भारतीय लष्कराच्या आसाम रेजिमेंटच्या सहकार्याने हे शस्त्र प्रदर्शन आयोजित केले होते, ज्याला सकाळपासून उदंड प्रतिसाद मिळत होता. भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्रांचे हे प्रदर्शन पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांसह हजारो नागरिकांनी कालिदास मैदानात गर्दी केली होती.

यांचा झाला गौरव
सातारा जिल्‍ह्यातील करवडी येथील शहीद शिपाई रोमित तानाजी चव्हाण, कोल्हापूरचे शहीद शिपाई अविनाश आप्पा कागीणकर आणि नाशिक येथील शहीद लान्स नाईक प्रसाद कैलास क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र व छायाचित्र देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रत्येक कुटुंबाला दीड लाख रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली.