दुकानातील चोरीचा पर्दाफाश

दुकानातील चोरीचा पर्दाफाश

Published on

अंधेरी, ता. ८ (बातमीदार) ः जानेवारी महिन्यात अंधेरीतील एका दुकानामध्ये झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका दुकलीस पोलिसांनी नुकतीच अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सिद्धेश रघुनाथ पाटील आणि विकास ब्रिजेश मिश्रा अशी या दोघांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मालाड येथे राहणारे कृषिक रमेश गाला हे व्यापारी असून त्यांचे अंधेरीतील कृष्णा कंपाऊंडमध्ये एक दुकान आहे. ३१ जानेवारीला रात्री उशिरा त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरांने सुमारे दोन लाख रुपयांचे कपाटाचे हॅडेल असलेले बॉक्सची चोरी केली होती. दुसऱ्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संताजी घोरपडे, पोलिस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. त्‍यांनी अंधेरी परिसरातून सिद्देश पाटील आणि विकास मिश्रा या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. या दोघांकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांच्या अटकेने चोरीसह घरफोडीच्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.