आयएनएस विक्रांतवर विमानाचे यशस्वी लँडिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयएनएस विक्रांतवर विमानाचे यशस्वी लँडिंग
आयएनएस विक्रांतवर विमानाचे यशस्वी लँडिंग

आयएनएस विक्रांतवर विमानाचे यशस्वी लँडिंग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भारतीय नौदलाने सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांतवर नौदलाचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजेच एलसीए विमानाचे पहिले यशस्वी लँडिंग केले आहे. नौदलाच्या वैमानिकांनी प्रथमच या मल्टिरोल फायटर विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी लँडिंग केले. भारतीय नौदलाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतीय नौदलाकडून आत्मनिर्भर भारतासाठीचा ऐतिहासिक टप्पा गाठला असल्याचे सांगितले जात आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवर स्वदेशी लढाऊ विमानांचे उतरणे हे भारताच्या स्वावलंबनाच्या शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. हे ऑपरेशन विक्रांतची रचना, विकास, बांधणी आणि ऑपरेट करण्याची भारताची क्षमता दर्शवते. हे मिशन खूप खास आहे. कारण कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेवर लढाऊ विमान उतरवणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. कारण विमानवाहू नौकेची धावपट्टी खूपच लहान असते.
विशेष म्हणजे विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रांत आणि त्यावर लँडिंग करण्यात आलेले एलसीए विमान दोन्ही भारतात बनवण्यात आले आहेत. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने आयएनएस विक्रांतची निर्मिती केली आहे. एलसीए नौदल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे तयार करण्यात आले आहे. एलसीए विमान तेजस या नावाने ते हवाई दलात कार्यान्वित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजी ही विमानवाहू नौका विक्रांत नौदलात दाखल केली होती. या नौदलाच्या जहाजाला समुद्रावरील हवाई दलाचे स्टेशन म्हणता येईल.
...
१६०० कर्मचारी तैनात
विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत हा देशाच्या स्वावलंबनाचा सर्वांत मोठा पुरावा आहे. या विमानवाहू नौकेवर १६०० कर्मचारी तैनात आहेत. युद्धनौकेचे वजन ४५,००० टन आहे आणि त्याची कमाल गती २८ नॉट्स आहे. विक्रांतकडे जवळपास २,२०० कंपार्टमेंट आहेत.