महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने वायुगळती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : गांधीनगर परिसरात महानगर गॅसची पाईपलाईन फुटून वायुगळती झाल्याची घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी घडली. या परिसरात एका इमारतीचे काम सुरू असल्याने जेसीबीने खणताना वाहिनी फुटल्याचे समोर आले. सुमारे पाऊण तासानंतर कंपनीकडून पुरवठा बंद करण्यात आला. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी काही काळ वायुगळती सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरात चिंतामणराव देशमुख मार्गावर एका इमारतीचे काम सुरू आहे. या कामकाजावेळी जेसीबीने खणण्याचे काम सुरू असताना सायंकाळी ५ ते ५.१५ च्या सुमारास जमिनीखालून गेलेल्या महानगर गॅसच्या पाईपलाईनला धक्का बसल्याने ती फुटली. गॅसचा प्रेशर जास्त असल्याने मोठ्याने आवाज येऊ लागला. गॅसलाईन फुटल्याचे समजताच जेसीबी चालकाने तेथून पळ काढला. मोठा आवाज आणि गॅसचा वास येऊ लागल्याने नागरिकांनी चौकशी केली असता गॅसची लाईन फुटल्याचे लक्षात आले. स्थानिक नागरिक शशिकांत कोकाटे यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास कंपनीकडून या लाईनवरील गॅस पुरवठा बंद करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.