मुंबई विमानतळाला दहशतवादी हल्ल्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमानतळाला दहशतवादी हल्ल्याची धमकी
मुंबई विमानतळाला दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबई विमानतळाला दहशतवादी हल्ल्याची धमकी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दूरध्वनी करून दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर २७ वर्षीय आरोपी इरफान शेखला सहार पोलिसांनी २४ तासांत चेंबूर येथून अटक केली. अशा प्रकारे मुंबईत घातपात घडवण्याच्या धमकीचे एकाच आठवड्यात हे दुसरे प्रकरण आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ला करू, असा धमकीचा ई-मेल ३ फेब्रुवारीला एनआयए या तपास यंत्रणेच्या मुंबईतील कार्यालयात पाठवण्यात आला होता.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट काँटेक सेंटरच्या संकेतस्थळावर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा धमकीचा दूरध्वनी आला होता. संबंधित व्यक्तीने स्वत:चे नाव इरफान अहमद शेख असे सांगितले होते. तो इंडियन मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत संशयास्पद कोडभाषेत संवाद साधत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेनंतर संपूर्ण तपास यंत्रणा अलर्ट झाली. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
...
पोलिस तपास
धमकी देणाऱ्या इसमाचा शोध घेण्यासाठी पोलिस ठाणेस्तरावर पोलिस पथक तयार करण्यात आले. तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणाच्या आधारे धमकीचा दूरध्वनी करणारा इसम चेंबूर येथील असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्वरित कारवाई करत पोलिसांनी २४ तासांत आरोपीला ताब्यात घेतले.
...
सुरक्षेत वाढ
‘एनआयए’ला यापूर्वी आलेल्या धमकीनंतरच मुंबईत अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली होती. मंत्रालय, महत्त्वाची कार्यालये, स्टॉक एक्स्चेंज, हॉटेल ताज, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, उच्च न्यायालय, हाजी अली दर्गा, पंचतारांकित हॉटेल आदी ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळासह इतर ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.