मोखाड्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा

मोखाड्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा

Published on

मोखाडा, ता. ९ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषदेंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानात दोन दिवसीय या क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ यांच्या उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून करण्यात आले आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, संगीत खुर्ची, धावणे, बुद्धिबळ, धावणे रिले, रस्सीखेच, बॅडमिंटन, कॅरम आणि रांगोळी या खेळांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानात ६ व ७ फेब्रुवारी अशा दोन दिवस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडू आणि संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड होणार आहे. खेळाडू बनलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी कुलदीप जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर, पंचायत समिती सदस्या लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील तसेच पत्रकारांनी स्पर्धांना उपस्थित राहून प्रोत्साहित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.