आंतरबँक क्रिकेट स्पर्धेत जी.पी.पारसिक बँक अजिंक्य

आंतरबँक क्रिकेट स्पर्धेत जी.पी.पारसिक बँक अजिंक्य

Published on

ठाणे : जी. पी. पारसिक सहकारी बँकेतर्फे सहकारमूर्ती स्वर्गीय गोपीनाथ दादासाहेब पाटील स्मृती चषकासाठी आंतरबँक क्रिकेट स्पर्धा खारेगांव, कळवा येथे पार पडली. अंतिम सामन्यात जी. पी. पारसिक बँकेच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. या क्रिकेट स्पर्धेत ठाणे भारत सहकारी बँक, एसव्हीसी बँक, सारस्वत को.ऑप. बँक, अभ्युदय को-ऑप. बँक, टीजेएसबी सहकारी बँक, वसई विकास को-ऑप. बँक, एनकेजीएसबी बँक, डीएनएसी को-ऑप. बँक, इंडसिंड बँक, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान को-ऑप. बँक, अपना सहकारी बँक, अंबरनाथ जयहिंद सहकारी बँक इ. नामवंत बँकांच्या संघांनी भाग घेतला होता. यात जी. पी. पारसिक बँकेच्या संघाने स्मृतिचषक व रोख रकमेचे पारितोषिक पटकावले. त्याप्रसंगी जी. पी. पारसिक बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक व माजी अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघातर्फे स्मृतिचषक व धनादेश स्‍वीकारताना जी. पी. पारसिक क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल ठाकूर, रोशन पाटील व सहकारी खेळाडूंसोबत बँकेचे संचालक दशरथ घरत, नामदेव पाटील, दशरथ पाटील, रमाकांत लाहोटी, कय्युम चेऊलकर, विक्रम पाटील, प्रदीप म्हात्रे, मनोज गडकरी आणि यशवंत मते इत्यादी दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.