जिल्ह्यात दोन आमदार निवडून येणार

जिल्ह्यात दोन आमदार निवडून येणार

पालघर, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार असला तरी पुढील निवडणुकांमध्ये त्यांच्या सोबतीला आणखीन एक आमदार निवडून येईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला. शहरातील लायन्स क्लब सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी त्यांनी पक्षातर्फे आपला मानस व्यक्त केला. पक्षाचे नेते शरद पवार यांची विचारधारा गाव पाड्यापर्यंत पोहचवण्यासाठी सुरू केलेल्या शरद युवा संवाद यात्रेनिमित्त मेहबूब शेख पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
सद्यस्थितीत देशासह राज्यात राजकीय अराजकता सुरू आहे. ही अराजकता दूर करण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करून पक्षनेते शरद पवार यांची विचारधारा त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी ही यात्रा महत्त्वाकांक्षी ठरत असून सर्वधर्म समभावतेचा संदेश देणाऱ्या विचारधारेचे बीज या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर रुजवत असल्याचे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यभर यात्रा आयोजित करून पक्ष विस्तारासंदर्भात आढावा सुरू आहे. पालघर हा या यात्रेचा २८ वा जिल्हा असून ३०७ वी आढावा बैठक तालुक्यांत घेतली जात आहे, असेही शेख यांनी सांगितले.
या वेळी आमदार सुनील भुसारा यांच्यासह पालघर मधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद ठाकूर, युवक नेते काशिनाथ चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष वरूण राजेश पारेख, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सचिन पाटील, महिला पदाधिकारी कीर्ती मेहता तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com