आदर्श निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

आदर्श निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

Published on

डहाणू, ता. ८ (बातमीदार) : चिंचणी देदाळे केंद्रशाळेतर्फे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदर्श निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोलवली देदाळे केंद्र शाळा येथे सोमवारी केंद्रप्रमुख हितेश धर्ममेहेर यांनी डहाणू पंचायत समिती कक्षा अधिकारी शालिनी अशोक चुरी आणि माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा विनोद चुरी यांचा सत्कार केला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चिंचणी के. डी. हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक विनोद लक्ष्मण चुरी होते. या सत्कार समारंभाला कोलवली देदाळे उपसरपंच विलास पाटील, केंद्रप्रमुख हितेश धर्ममेहेर, जिल्हा परिषद शिक्षक पंकज नित्रुडकर, शिक्षक, पालक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्कार मूर्ती शालिनी चुरी आणि प्रतिभा चुरी यांना अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी आपली वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे, त्याशिवाय आपली प्रगती करू शकणार नाहीत, असे मनोगत शालिनी चुरी यांनी व्यक्त केले; तर प्रतिभा चुरी यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन, कष्ट करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.