पाणजूत विविध कामाचे भूमिपूजन

पाणजूत विविध कामाचे भूमिपूजन

विरार, ता. ८ (बातमीदार) : नायगाव आणि भाईंदर या दोन खाड्यांच्या मध्ये वसलेल्या पाणजू या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध कामांचे भूमिपूजन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाणजू ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येणाऱ्या नवीन अंगणवाडी केंद्र आणि जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी आणि पंचायत समिती सभापती अशोक पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती संजय म्हात्रे, माजी परिवहन सभापती प्रितेश पाटील, माजी नगरसेवक मनीष वर्तक, प्रवीण वर्तक, ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन ठाकूर, संचालक निवृत्ती घुसेकर, चंद्रकांत पाटील आणि आशीष वर्तक उपस्थित होते. या वेळी पाणजू ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच हेमांगी भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजने संदर्भात जिल्हा परिषदेचे अभियंता प्रदीप कुलकर्णी, स्टेम पाणीपुरवठा प्रधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालकसंकेत घरत, पश्चिम रेल्वेचे एडीइएन अखिलेश मिश्रा यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाईपलाईन अंथरणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असे आदेश हितेंद्र ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच रेल्वे ब्रिजवरील पाईपलाईन अंथरणीबाबत रेल्वेकडून आकारण्यात आलेल्या सुरक्षा ठेवीतून सूट मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून तोही प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com