सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ‘दे धम्माल’

सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ‘दे धम्माल’

Published on

जुईनगर, ता.८(बातमीदार)ः लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र महोत्सव समितीच्या वतीने जुईनगरमधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला सुरू असलेल्या महाराष्ट्र जत्रोत्सवाला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. भाजप महामंत्री राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून जत्रोत्सवामुळे खऱ्या अर्थाने कलाकारांना हक्काचे व्यासपीठ दिले आहे.
नवी मुंबई शहरात विविध समाजातील लोक गेली अनेक वर्ष गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यांचे राहणीमान, भाषा जरी वेगळी असली तरी या शहराला त्यांनी आपलेसे केले आहे. त्यामुळे शहरातील संस्कृतीमधील हे वेगळेपण टिकवण्यासाठी महाराष्ट्र महोत्सव समितीच्या माध्यमातून जुईनगरमध्ये कला-क्रीडा महोत्सवातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ दिले जात आहे. या महोत्सवाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामध्ये शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सांस्कृतिक कार्यक्रम दर्या सारंगा आगरी कोळी सांस्कृतिक कार्यक्रम दिवंगत जनार्दन पाटील विद्यालय शाळा क्रमांक १७ च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच शनिवार ११ फेब्रुवारी रोजी माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ लावण्यांचा’ आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ असे कार्यक्रम देखील होणार आहे.
-------------------------------------
जुईनगरमध्ये होत असलेल्या जत्रोत्सवाचे हे २३ वे वर्ष आहे. या जत्रोत्सवातील विविध कार्यक्रमांसह लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थांची मेजवानी अनुभवण्याची संधी नवी मुंबईकरांनी मिळणार आहे.
-राजेश पाटील, भाजप महामंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.