तळोजा पुलाची एक मार्गिका बंद

तळोजा पुलाची एक मार्गिका बंद

Published on

नवीन पनवेल, ता. ८ (वार्ताहर)ः तळोजा पुलावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या पुलावरील एमआयडीसीमधून फूडलॅण्ड चौकात येणारी एक मार्गिका बुधवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तळोजातून मुंब्रा-पनवेल मार्गावर येण्यासाठी नावडे रेल्वे पुलाचा वापर करावा, असे आवाहन तळोजा वाहतूक विभागाने केले आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी नावडे रेल्वे पुलावर पडणारा ताण लक्षात घेता कळंबोली स्टील मार्केटच्या फूडलॅण्ड येथून एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी सिडकोने नवीन पूल बांधला आहे; परंतु सद्यस्थितीत या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे सिडकोने पुलावरील खड्डे बुजवण्याचे हाती घेतले आहे. या कामामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधून फूडलॅण्ड चौकाकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक चौकी समोरून डावीकडे वळण घेण्याऐवजी वाहनचालकांनी पनवेल-मुंब्रा महामार्गावर येण्यासाठी नावडे पुलाचा वापर करण्याची सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
-------------------------------
पुलाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने एक मार्गिका बंद केली गेली आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण नावडे येथील चौकात येणार असून जागोजागी वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.
- सुनील कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, तळोजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.