पानटपरी चालकाला धमकावणारा अटकेत

पानटपरी चालकाला धमकावणारा अटकेत

Published on

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : पोलिसाचा गणवेश घालून छोट्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन हप्तेवसुली करणाऱ्या एका तोतयासह त्याच्या सहकाऱ्याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले आहे. हेमंत बेंद्रे (४२) व अंकुश माने (२९) अशी या तोतया पोलिसांची नावे आहेत. त्यांच्यावर खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रबाळे दिवा नाका येथे राहणाऱ्या पानटपरीचालक मुरादअली मन्सुरी (२५) यांना दहा दिवसांपूर्वी हेमंत बेंद्रे याने पोलिस असल्याचे सांगून गुटख्याची विक्री करत असल्याचे सांगत केस करण्याची धमकी दिली होती. या वेळी हेमंत बेंद्रे हा पोलिस गणवेशात असल्याने मन्सुरी याने त्याला घाबरून हप्ता दिला होता. मात्र २ फेब्रुवारी रोजी हेमंत बेंद्रे पुन्हा मन्सुरी याच्या पान टपरीवर साथीदार अंकुश माने याच्यासोबत गेला होता. यावेळी बेंद्रे याने मन्सुरी याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.