पेणमधील मंदिरातून चांदीच्या मूर्तीची चोरी

पेणमधील मंदिरातून चांदीच्या मूर्तीची चोरी

Published on

पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण कोळीवाडा येथील कोळी बांधवांची श्रद्धास्थान असणाऱ्या एकवीरा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवीची चांदीची मूर्ती आणि चांदीच्या पादुका असा जवळपास दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शहरातील कोळीवाड्यात एकवीरा मंदिरात देवीची दोन किलो चांदीची मूर्ती आणि दोन किलो चांदीच्या पादुका होत्या. रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र आज (ता. ८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातून चांदीची मूर्ती आणि चांदीच्या पादुका लंपास केल्या. पेण शहरातील गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चोरट्याच्या शोधाकरीता पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.