मोबाईल टॉवरविरोधात चिमुकल्यांचे आंदोलन

मोबाईल टॉवरविरोधात चिमुकल्यांचे आंदोलन

Published on

विरार, ता. ९ (बातमीदार) : आगाशी परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरविरोधात चिमुकल्यांनी आंदोलन केले. दुष्परिणाम टाळण्यासाठी मोबाईल टॉवरची परवानगी नाकारावी, अशी मागणी करत या चिमुकल्याने वसई-विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करून परिसर दणाणून सोडला.
मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे हवा प्रदूषित होऊन वृद्ध, लहान बालक, पशु-पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहेत. त्यामुळे या टॉवरचे काम तत्काळ थांबवावे, ही मागणी घेऊन चिमुकल्या मुलांनी आंदोलन केले.
विरार पश्चिम आगाशी परिसरातील गोपचार कातरवाडी, रायवाडी, पंतार, गोनभात या परिसरात हे मोबाईल टॉवर उभारण्याचे काम चालू आहे. या टॉवरला रहिवाशांनी विरोध करत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पण प्रशासन दखल घेत नसल्यामुळे महापालिकेसमोर चिमुकल्यांनी मोबाईल टॉवर नको, असे म्हणत आंदोलन छेडत पालिका अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.