बँकेचा कारभार तीन दिवसांत पूर्ववत

बँकेचा कारभार तीन दिवसांत पूर्ववत

Published on

कर्जत, ता. ९ बातमीदार ः शहरातील टिळक चौकात असलेली दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रविवारी पहाटे लागलेल्‍या आगीत मोठी वित्त हानी झाली होती. मात्र ग्राहकांचे पैसे आणि दागिने सुरक्षित होते. बँकेतील कागदपत्रे, फर्निचर जळून खाक झाल्याने त्याच जागेत त्वरित बँक सुरू करणे शक्य नव्हते. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने खातेदारांची गैरसोय होऊ नये, याकरिता त्वरित शहराच्या मध्यभागी हनुमान मंदिराच्या तळमजल्यावर अवघ्या तीन दिवसांत बँक पूर्ववत सुरु केली. त्‍यामुळे खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.