राज्यस्तरीय रोलर स्केटिंग व हॉकीला सुरुवात

राज्यस्तरीय रोलर स्केटिंग व हॉकीला सुरुवात

Published on

विरार, ता. ९ (बातमीदार) : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा परिषदेद्वारे आयोजित राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेला अमेय क्लासिक क्लबच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग टर्फवर सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागातून स्केटिंगमध्ये ३८४ स्पर्धक तर रोलर हॉकी खेळामध्ये ६० खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी कोरोनाच्या प्रार्दूभावातून सावरून पुन्हा सुरू झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंना कसे फायदे मिळतात, त्यासाठी खेळाडूंनी कशी मेहनत घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. उद्‌घाटक विलास चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष गोविंद बोडके यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन करतांना क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी अमेय क्लासिक क्लब यांनी स्पर्धेसाठी निवास तसेच क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल तर महाराष्ट्र राज्य स्केटिंग संघटनेने केलेल्या तांत्रिक सहकार्याबद्दल व खेळाडूंना मेडल्स प्रायोजित केल्याबद्दल आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.