गुरवपाड्यात भिंती रंगवून चालते बोलते शिक्षण

गुरवपाड्यात भिंती रंगवून चालते बोलते शिक्षण
Published on

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : जिल्हा परिषद शाळा गुरवपाडा व प्रथम एज्युकेशन सामाजिक संस्था यांच्यामार्फत पाड्यात बोलक्या भिंती झाल्या फळा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला आहे. शिक्षण हे चार भिंतीच्या आतच नसून शिक्षणाचे द्वार हे खुल्या वातावरणात उघडे करून चालता बोलता, खेळतानासुद्धा मुले शिकू शकतात आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकास करू शकतो. हा या माध्यमाच्या मागचा उद्देश आहे.
मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिले तर चांगले शिकण्यासाठी मदत होते. अभ्यासक्रमावर आधारित चित्रे काढलेल्या भिंतींमुळे मुलांना व गाव पाड्यांमधील गावकऱ्यांना उपयोग होऊ शकेल, यासाठी पाढ्यातील भिंतीवर अभ्यासाचे धडे रंगवण्याचा उपक्रम ठरवला. त्यामध्ये गणितातील संख्या प्रकार, भाषा विषय, इंग्रजी विषय, भूमिती सूत्रे अशा बोलक्या भिंती रंगवल्या आहेत. यासाठी मुख्याध्यापक केशव भोये, शिक्षक दशरथ धुमाळ, सुरेश भांड, गुरु तिरणकण, विनोद कोरडे, गोपी कोदे, अंकुश खांजोडे आदी सहकार्य करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com